Search
Close this search box.

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने सन्मान..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

  • नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल

नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपूत्र पत्रकार श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजक प्रमुख क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध रंगकर्मी प्रमोद ठाकूर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला अवार्ड शो म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा समाज हॉल कुडाळ येथे दि.29 मार्च 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांसह रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, श्री नाईक, श्री पावसकर, चिमणी पाखरचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष श्री रवि कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर हे नृत्य क्षेत्रात मागील 20 वर्षाहून अधीक काळ कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही ते नेहमी अग्रणी असतात. चिमणी पाखरं या संस्थेने केलेल्या सत्कारा बद्दल पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर त्यांच्यावर मालवण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें