पत्रकार दिपक निगडे
नवी मुंबई घणसोली। आज दिनांक 30/03/2025 रोजी एक सर्वसाधारण घरातील व्यक्ती रिक्षा चालक विजय शिंदे हे त्यांचा मुलगा निखिल शिंदे याला डिवाइन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सेक्टर 6 घनसोली या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची रिक्षा हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंग केली होती त्यावेळेस घनसोली येथील काही चोरांनी मिळून एम एच 43 बी एफ 9396 या रिक्षाचे तिन्ही टायर चोरून नेले ही एक खरोखरच लज्जास्पद बाब आहे, 112 नंबर डायल करून पोलिसांना सूचना करण्यात आली त्यानंतर बीट मार्शल येऊन चौकशी करून गेले. परंतु सर्वसाधारण लोकांच्या खिशाला अशा प्रकारे जर कात्री बसू लागली तर त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आमचा नवी मुंबई पोलीस प्रशासनावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ते लवकरात लवकर त्या चोरट्यांना पकडून आमच्या गाडीचे टायर परत करतील असा शिंदे परिवारात चा विश्वास आहे आणि तो विश्वास कायम राहील असं ते या वेळेस म्हटले.