रिपोर्टर हेमंत व्यास.
सांगली/कडेगांव। राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर वाहतुक करणाऱ्या टोळीवर कडेगांव पोलिसांनी कडक कारवाई केली.भिकवडी येथे विटा पुसेसावळी रस्त्यावर इनोव्हा कार (एम एच १२डीएम ३८१७)अडवून तब्बल ३लाख ४३ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सोमवार दि ३मार्च रोजी संध्याकाळी ७.१५वाजता कडेगांव पोलिसांनी ही कारवाई केली.मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व तंबाखु आढळून आले.
हा माल विक्रिसाठी नेला जात असल्याची माहीती पुढे आली आहे.या प्रकरणी अल्लाउद्दीन सादिक बारगिर (वय ३०) ख्वाजा कॉलनी सांगली,अल्ताफ इस्माईल शेख ( वय३९,गांधी कॉलनी सांगली)इरशाद सिंकदर मुलाणी (ख्वाजा कॉलनी सांगली)आणि साहील (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यापैकी अल्लाउद्दीन बारगिर व अल्ताफ शेख यांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे पोलिस हवालदार अमोल नायर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे