प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली /तासगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिन तासगावच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव प्रशाली मध्ये उत्साहात संपन्न झाला असून यावेळी तासगाव पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकातील महिला पोलीस आणि पोलीस कर्मचारी तसेच गेल्या दहा वर्षात आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून कार्यक्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा गुणगौरव शाळेच्या वतीने यावेळी करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी विद्यार्थिनी व निर्भया पथकातील पोलीस कर्मचारी श्री वाघमारे, श्री देशमुख व श्रीमती सदाकळे मॅडम यांचा गौरव गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन मुख्याध्यापकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
शाळेच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री पतकी (BCA) डाॅ.धनश्री गोवंडे-जोशी,
डाॅ.श्रुती पाटील, मधुरा देशपांडे (अभियंता), वैदेही म्हैसकर (अभियंता) अपूर्वा फाकडे (अभियंता), भावना खंडागळे (तलाठी), प्रज्ञा इनामदार (आर्किटेक्ट), उपस्थित होत्या. आपल्या यशातील शाळेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री जोग सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक श्री ऐतवडेकर सर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री नितीन जोशी यांनी केले.