प्रतिनिधी- अतुल काळे
- वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात बदलत्या अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा
सांगली/तासगाव : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव या ठिकाणी बीए भाग तीन अर्थशास्त्र विषयातील बदलत्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक शैक्षणिक धोरणानुसार आपणास बदलावे लागणार आहे. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी आपल्यामध्ये बदल करावे लागणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ.जे.एस.इंगळे होते. बोलताना ते म्हणाले, की विद्यार्थ्यांनी समाजाच्या सर्व समावेशक विकासासाठी शिक्षणाचा उपयोग करावा. प्रथम सत्राचे साधन व्यक्ती डॉ.राहुल म्होपरे हे होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयातील बारकावे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. द्वितीय सत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ.एस. एम.भोसले होते. त्यांनी आपल्या मनोगत नियोजनाची गरज प्रकर्षाने मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख उपप्राचार्य जे.ए.यादव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.कुलदीप पाटील यांनी करून दिली. सदर कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक हजर होते. श्री.डी.ए.होनमाने,डॉ. मनोहर कोरे, प्रभाकर माने,प्रोफेसर डॉ. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. शहाजी पाटील, डॉ. प्रमोद वलेकर, विद्यार्थी प्रतिनिधी अंकिता साळुंखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार डॉ.बंडू कदम यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.