Search
Close this search box.

निमणीत लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : प्रभाकरबाबा पाटील

सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी येथील महादेव मंदिरात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रभाकरबाबा म्हणाले, लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. शासनाने सुरू केलेल्या या योजनेपासून पात्र असलेली महिला वंचित राहता कामा नये.
यावेळी अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींवर तसेच लागणाऱ्या कागदपत्रासंदर्भात चर्चा झाली. कृष्णा पाटील यांनी शंकांचे निरसन केले. गावातील कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ रेखा पाटील, ग्रामसेवक किरण जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, तासगांव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने शिधापत्रिके संदर्भातील कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब तासगाव तहसीलदार यांना सांगण्याबाबत ग्रामस्थांनी आग्रह धरला असता प्रभाकर पाटील यांनी तात्काळ नवनियुक्त तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून कर्मचारी वाढविण्याची विनंती केली.
यावेळी माजी उपसरपंच आर डी पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, दिनकर पाटील ,नामदेव जमदाडे ,सदस्या सौ शुभांगी सपकाळ , संगीता चौगुले कल्पना सुखदेव , पोलीस पाटील सतीश अशोक पाटील, बटु कोळी, शिवाजी देवकुळे, अंगणवाडी सेविका शारदा गायकवाड, अक्कमहादेवी देवकुळे, अर्चना पाटील, अरुंधती पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें