Search
Close this search box.

राजुर मध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून. सर्वसामान्य नागरिक झाले त्रस्त एक प्रकारे राजूरमध्ये झाला वाहतुकीचा बोजवारा….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -: सचिन मुतडक

राजुर पोलीस स्टेशन ते गणपती मंदिर या रोडवर नेहमीच वर्दळ असते. तसेच राजूर ही चाळीसगाव डांगणाची मुख्य बाजारपेठ असल्याकारणाने, या बाजारपेठेमध्ये बहुसंख्येने लोक खरेदी विक्रीसाठी दैनंदिन येत असतात. त्यामुळे या रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर उद्भवताना दिसत असते. या वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार तरी कोण..? असा संतप्त सवाल अनेक नागरिक करत आहे. या रोडच्या दुथर्फा दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर दुचाकी स्वार आपली वाहने वेडी वाकडी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचं काम करत असतात. नुकतीच पावसाळ्याची चाहूल लागल्या कारणाने राजूर बाजारपेठेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर बी बियाणे व खते खरेदीसाठी येत असतो तसेच ह्या दुकानांमध्ये येणारा माल हा मोठ्या मोठ्या वाहनांमधून उतरविण्यासाठी दुकानाच्या बाजूलाच मोठी मोठी वाहने दोन दोन तास उभी केलेली असतात. त्यामुळे या परिसरामध्ये दैनंदिन वाहतुकीच्या कोंडीला सर्वसामान्य नागरिकाला सामोरे जावे लागते. या वाहतुकीच्या कोंडीस जबाबदारी जबाबदार तरी कोण असा असेल संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. राजुर पोलीस स्टेशन मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याकारणाने वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर कर्मचारी येऊन वाहतूक सुरळीत करून निघून जातात. त्यानंतर पुन्हा काही वेळानंतर वाहतुकीची समस्या निर्माण होते. तसेच यास सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील या परिसरातील सर्व दुकानदारांना अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या असून देखील त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळेच दुकानदार देखील बिनधास्त पणे रस्त्यावर वाहनांना कुठल्याही प्रकारे नियोजन न करता प्रोत्साहन देण्याचे काम एक प्रकारे करताना दिसून येत आहे. तसेच राजूर ग्रामपंचायत देखील अतिक्रमणाबाबत कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. व या वाहनांवर देखील कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याकारणाने सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला असून. या वाहतुकीदरम्यान अडथळा निर्माण झाल्यास एखाद्या वाहनचालकास सर्वसामान्य नागरिकांनी सूचना केल्यास किंवा मोबाईलवर न बोलता आपलं वाहन पुढे नेऊन लावा असं सांगितल्यानंतर देखील हे वाहनचालक सर्वसामान्य माणसाला देखील दादागिरी करताना दिसून आले आहे. म्हणजेच एकंदरीत या वाहतुकीच्या कोंडीवर कुठल्याही प्रकारे कुणाचेच नियंत्रण नसल्याकारणाने या वाहतुकीला पाय बंद घळणे कठीण होत चालले दिसून येते. दररोज या वाहतुकीचा अडथळा मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांची अडचण नसून कोळंबा झालेला दिसून येत आहे. तरीही राजुर पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, व राजूर ग्रामपंचायतीने, आपापली कारवाई करून या अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. तसेच दत्त मंदिरापासून बाजार पेठेमध्ये जाणाऱ्या रोडवर देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झालेले असून, कुठल्याही प्रकारची शिस्त नसल्याकारणाने संपूर्ण गावातच वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशी चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहे. या सर्वसामान्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन या वाहतुकीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवत सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न कसा मार्गी लागतो याकडे सर्वसामान्य जनतेचे व या वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन