पत्रकार दिपक निगडे.
भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे यांनी परिवहन व्यवस्थापक अधिकारी योगेश कडुसकर यांच्या निलंबनाची मागणी केली होती तसेच त्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. या समस्येला तोंड देण्यासाठी इतर ही कार्यकर्ते व पक्षाच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न केले होते, परंतु संबंधित विभागाने यावर कारवाई न करता कानाडोळा केला होता. ही समस्या किशोर लोंढे यांच्या जवळ आल्यानंतर पाठपुरावा करत शेवटी योगेश कडुसकर यांच्या निलंबनाची मागणी भारतीय मीडिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून करताच, अधिकारी जागे झाले व उपोषणा अगोदर बस थांबा हा पुर्वीच्या जागी हलविण्यात आला आहे.
किशोर लोंढे यांनी तुर्भे विभागातील व झोपडपट्टीतील जनतेला न्यायासाठी लढायला हवे असे संबोधित केले.
तसेच येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या सारख्या गरिब व झोपडपट्टीतील जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना निवडून द्यावे असे आवाहन जनतेला केले