देहबोलीतून इतरांच्या भावना ओळखता येतात – प्रा.डॉ.ए.बी.साळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : “देहबोलीतून दुसऱ्याच्या मनात असलेले विचार समजतात. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजते. तसेच एखाद्या व्यक्तीचे भविष्यकालीन उद्दिष्ट समजते. देहबोलीद्वारे एखाद्या व्यक्तीच्या भावना समजतात. देहबोली शास्त्राच्या अभ्यासाने स्वतःचे वर्तन कसे असावे यासंबंधी निर्णय घेता येतात” अशा प्रकारचे विचार प्रा. डॉ.ए.बी. साळी यांनी स्वामी विवेकानंद सप्ताह निमित्त आयोजित व्याख्यानमालेत सांगितले.
तासगाव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. दैनंदिन परिपाठा नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले. अमृता पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. सुप्रिया पाटील व प्रणाली मस्के यांनी अभिवाचन केले.सफिना मूल्ला व अंजली परमाने यांनी समायोचित मनोगते सादर केली. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा.डॉ.ए.बी.साळी यांनी ‘देहबोलीशास्त्र व मानवी वर्तन’ या विषयावर आपले विचारांचे सखोल सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले. स्नेहल पाटील व कोमल मोरे यांनी सूत्रसंचालन तर आरती पाटील यांनी आभार अभिव्यक्ती केली.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा.डॉ. एम.एस.उभाळे यांनी केले. प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर या कार्यक्रम प्रमुख होत्या. प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे, प्रा.डॉ.डी.टी.खजूरकर, प्रा.ए.आर.पंडित,प्रा.पी.एस. शेंडगे, प्रा.ग्रंथपाल ए.जी. पाटील, श्री सुनील कुंभार, सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

और पढ़ें