Search
Close this search box.

‘आदर्श’ बाबत मला तोंड उघडायला लावू नका : संजयकाका पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • केव्हाही एका व्यासपीठावर या, कामाचा लेखाजोखा करू : संजय काकांचे रोहित पाटील यांना आव्हान

सांगली /तासगाव : आम्ही गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलत नाही. पण, यांचं ‘आदर्श’मध्ये काय होते. कोणाच्या नावावर फ्लॅट आहे, याबाबत आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा देतानाच रोहित पाटील यांना उद्देशून संजय पाटील म्हणाले, ‘अरे बाळा, तू अजून लहान आहेस. आमच्यासारख्याला मर्यादेत राहायला आवडतं. कारण तशी या जिल्ह्याची संस्कृती आहे. कमरेखालील वार करू नका. आम्ही तोंड उघडले तर चांगलं होणार नाही.

कुठलाही दिवस सांग, कुठंही यायला तयार आहे : संजय पाटील यांचे रोहित पाटलांना आव्हान

रोहित पाटील हे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. तासगावच्या कडेने बायपास मंजूर झाला. त्यासाठी 173 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र श्रेय घेण्यासाठी हापापलेल्या रोहित पाटील यांनी भिलवडी नाक्यात जाऊन बोर्ड लावत फटाके वाजवले. त्यांचा किती बालिश व पोरकटपणा आहे. त्यांनी जरा तरी जनतेशी विश्वासाने रहावे. लोकांशी प्रतारणा करणारी लोकं अडचणीत येतात. मी कधीही आणि कुठेही एका व्यासपीठावर यायला तयार आहे. कुठलाही दिवस आणि ठिकाण सांगा. तुम्ही 35 वर्षात केलेली कामे आणि तुम्ही 10 वर्षात केलेली कामे याचा हिशोब लोकांसमोर मांडू. लोक न्यायदेवता आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल.

गुणी बाळ सकाळी 11 वाजता उपोषणाला बसले आणि 6 वाजता पेंग्विनसारखे पेकाळून पडले : संजय पाटील यांचा रोहित पाटलांवर हल्लाबोल

जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. या योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र टेंभू योजनेच्या विस्तारित कामाचे श्रेय घेण्यासाठी रोहित पाटील हे गुणी बाळ सकाळी 11 वाजता जेवून – खाऊन उपोषणाला बसले. मात्र 6 वाजताच तो पेंग्विनसारखा पेकाळून पडला. पण साठ वर्षाच्या या शेलारमामाने नऊ दिवस उपोषण केले होते. पोलीस मी काय खातो का, ते बघायला उपस्थित होते. मात्र नऊ दिवसात माझा एक केसही वाकडा झाला नाही, अशा शब्दात संजय पाटील यांनी रोहित पाटलांवर हल्लाबोल केला.

Leave a Comment

और पढ़ें