प्रतिनिधी – अतुल काळे
- सुरेश चव्हाणके यांच्या व्याख्यानाचे आयोजन
सांगली/तासगाव : बांगलादेश व रोहिंग्यांनी देशभरात अतिक्रमण केले आहे. कट्टरतावाद फोफावला आहे. हिंदू संस्कृती धोक्यात आहे. त्यामुळे हिंदूंना जागृत करण्यासाठी सोमवार दि. 21 रोजी तासगाव येथे शिवप्रेरणा यात्रा आयोजित केली आहे. यात्रेनंतर नगरपालिकेच्या नाट्यगृहात सकाळी १० वाजता प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी दिली.
यावेळी संदीप गिड्डे म्हणाले, देशभरात शिवप्रेरणा यात्रा सुरू आहे. ही यात्रा सोमवारी तासगाव येथे येत असून निमित्ताने
सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान होणार आहे. सकल हिंदू समाज, शिवप्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, शाखा तासगाव, शिवनेरी कला, क्रीडा मंडळ यांनी पुढाकार घेतला आहे.
सुरेश चव्हाणके यांचा गोरक्षण, लव्ह जिहाद विरोध, राष्ट्रीयत्व यावर चांगला अभ्यास आहे. सध्या त्यांची शिवप्रेरणा यात्रा सुरू आहे. त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिड्डे यांनी केले. यावेळी सिद्धेश्वर लांब, गोविंद सूर्यवंशी, संदीप सावंत, मयुरेश कुलकर्णी, गजानन खेराडकर आदी उपस्थित होते.