Search
Close this search box.

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी-प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त विचारमंच

सांगली/तासगाव: वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी तरुण पिढीने वाचले पाहिजे.वाचन हेच ज्ञान ग्रहणाचे मुख्य साधन आहे. गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरी केली यावेळी ग्रंथालय विभागाने वाचन कट्ट्यावर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले.विद्यार्थ्यांना आपली मते व्यक्त करण्यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ हा विषय मुक्त विचार मंचासाठी दिला होता. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले डॉ.कलाम पुस्तकांना मित्र मानायचे आणि ग्रंथालयाला घर समजायचे.त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहायला लावली आणि पूर्णत्वासाठी प्रयत्न करायला भाग पाडले. विद्यार्थ्यांनी आपला बौद्धिक विकास साधण्यासाठी नियमित वाचनाची सवय लावावी असे सांगितले शरीराला जशी अन्नाची गरज असते तशी मेंदूला चांगल्या ज्ञानाची गरज असते.ग्रंथालयाच्या रुपाने मानवाला ज्ञानाचा खजिना लाभला आहे असे सांगून मोबाईलचे दुष्परिणाम कथन केले.वाचनामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात आणि मन आनंदी होते हे त्यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. मुक्त विचार मंचाचे परीक्षक म्हणून प्रा.रोहित लोंढे, प्रा.विशाल शेरकर, प्रा.मेघा पवार यांनी काम पाहिले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल मिनाक्षी मुसळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य जे.ए.यादव यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें