Search
Close this search box.

तरुणांनी विद्यार्थीदशेतच स्वावलंबी व्हावे -ज्ञानोबा फड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात रोजगार मेळावा

सांगली/तासगाव : शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. तरुणांनी विद्यार्थीदशेतच स्वावलंबी व्हावे असे उद्गार’ द मीडिया फायर’ कंपनीचे प्रोजेक्ट हेड डॉ.ज्ञानोबा फड यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे प्लेसमेंट, करिअर कौन्सिलिंग सेल आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या नोकरी मिळाव्यात बोलताना काढले.ते पुढे म्हणाले कंपनीच्या वतीने गुणवत्ताधारक आणि स्मार्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर नोकरीची संधी उपलब्ध करून देत असून वार्षिक अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत पॅकेज त्यांना दिले जाणार आहेत याशिवाय राहण्याची जेवणाची सोय कंपनीमार्फत केली जाणार आहे.यावेळी बोलताना निकीता काळे कंपनीची माहिती देऊन व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना या कंपनीत नोकरीची संधी मिळाली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हाच असल्याचे सांगून ‘द मीडिया फायर’ कंपनीचे महाविद्यालयात स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेल आणि करिअर कौन्सिलिंग कमिटीचे चेअरमन डॉ.जीवन घोडके यांनी केले तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अमोल सोनवले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला पूजा जाधव, विकास मस्के, डॉ.के.एन.पाटील, डॉ.विलास साळुंखे,डॉ.नितीन गायकवाड,डॉ.राजू गणेशवाडे,डॉ.सचिन शिंदे,प्रा.विशाल शेरकर, प्रा. विजय कुंभार यांसह महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें