Search
Close this search box.

जि. प. शाळा वायंगणी भंडारवाडी प्रशालेत “शारदोत्सव “उत्साहपूर्ण वातावरणात संपन्र…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग(महाराष्ट्र) – विवेक परब

सिंधुदुर्ग महाराष्ट्र। मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वांयगणी भंडारवाडी प्रशाळेत शारदोत्सव मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्र झाला. माजी विद्यार्थी गुरुनाथ धुळे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीस पुष्पहार, विविध रंगाची पुष्प अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. तसेच सुरेश पांजरी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रमाकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर आरत्या तर ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन पार पडले. कार्यक्रमासाठी आर्थिक व वस्तुरुपाने देणगी दिलेल्या दात्याचे गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी मुलामुलींचे विविध गुण दर्शनपर पार पडले. मुलांचा यथोचित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच समृद्धी आसोलकर, गुरुनाथ धुळे, सदानंद बांदेकर, शिक्षणप्रेमी माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकरसर, पोलिस पाटील सुनिल त्रिंबक्कर, माजी सरपंच सौ. संजना रेडकर, बौद्धविकास मंडळाचे अध्यक्ष दामोदर वायंगणकर, शाळा समिती अध्यक्ष सुगत वायंगणकर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. हातेकर मॅडम, पालक, विद्यार्थी ग्रामस्थ आदी होते. सूत्रसंचालन सौ. राणे मॅडम यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें