Search
Close this search box.

देशासाठी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांचे विचार आचरणात आणण्याची गरज – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

सांगली/तासगाव : आपला भारत देश घडविण्यासाठी देशाला महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची नितांत गरज आहे असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले, संपूर्ण जग आज चंगळवादाच्या विळख्यात अडकले आहे. युवक पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जात आहेत. धर्मभावना टोकदार झाल्या आहेत. अशावेळी साधेपणा, आपुलकी, सहिष्णुता, सत्य, अहिंसा, मानवतावाद या मूल्यांवर आधारित गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे.लालबहादूर शास्त्री यांनी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिला जो पुढे प्रसिद्ध होऊन यांचे ब्रीद घोषवाक्य म्हणून प्रसिद्ध झाला.शासनाच्या स्वच्छ भारत अभियान व स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ या सेवा पंधरवड्या निमित्त महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले. स्वच्छतेविषयी घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा , स्वच्छता गट , रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा,आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला तसेच श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावे म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.एक ऑक्टोबर सकाळी दहा ते अकरा स्वच्छता ही सेवा हे अभियान यशस्वीपणे राबवून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ. साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.एस.डी.पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रशासकीय सेवकवर्ग , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें