Search
Close this search box.

सकस आहार आणि संतुलित जीवनशैली हेच उत्तम आरोग्याचे रहस्य – डॉ. साहिल जमदाडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सांगली/तासगाव : मन प्रसन्न ठेवाल तरच शरीर प्रसन्न राहील.शरीराने व मनाने तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहार आणि संतुलित जीवनशैली हेच उत्तम आरोग्याचे रहस्य आहे असे उद्गार ग्रामीण रुग्णालय तासगावचे डॉ.साहिल जमदाडे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले सकस आहाराचे महत्त्व या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंब, खजूर , काळे मनुके,दूध,फळे भाजीपाला यांचा आपल्या आहारात समावेश करावा.तरुण राहायचे असेल तर पहाटे लवकर उठा आणि ताजी फळे खा ब्रह्म मुहूर्तावर उठल्याचे खूपच फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याविषयी सजग राहताना फास्ट फूड, जंक फूड च्या सवयी टाळण्याचा सल्ला दिला.
शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.हुजरे म्हणाले तासगावच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम अतिशय चांगले असून कोरोना काळापासून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवून हे शासनाचे रुग्णालय समाजाभिमुख झाले असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.तातोबा बदामे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. या शिबिरात महालॅबच्या व्यवस्थापक सौ.संगीता पाटील,श्री सह्याजी झांबरे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे लॅब टेक्निशियन चंद्रशेखर निकम आदी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या शिबिराचे कामकाज पाहिले.सुमारे १५७ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबीराच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.तातोबा बदामे, डॉ. नितीन गायकवाड, डॉ.डी.बी. गुंजाळ,डॉ. दत्तात्रय थोरबोले, प्रा.पी.एस.जाधव, प्रा.आण्णासाहेब बागल,
प्रा.साईनाथ घोगरे, प्रा.पल्लवी मिरजकर आणि एन.एस.एस.प्रतिनिधी सायली माने तसेच च्या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

Leave a Comment

और पढ़ें