Search
Close this search box.

शाळेच्या ऋणातून मुक्तीसाठी सढळ हाताने मदत कराः डॉ अधिकराव जाधव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्टर: सुहास कराडकर.

  • शाळेच्या ऋणातून मुक्तीसाठी सढळ हाताने मदत कराः डॉ अधिकराव जाधव

कडेगांव/सांगली। शाळेमुळेच आयुष्याचे जीवन घडले आहे .या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सढळ हाताने मदत करण्याची आज गरज आहे. असे मत लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय प्राचार्य डाँ अधिकराव जाधव यांनी व्यक्त केले तडसर येथील तात्या रावजी विद्यालयात

पद्मभूषण, डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पारितोषिक वितरण व देणगीदारांचा सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
विभागीय अध्यक्ष एम. बी. शेख हे अध्यक्ष स्थानी होते
विभागीय अधिकारी अशोक शिंदे , विलास नाना शिंदे,केंद्रप्रमुख महेश कुंभार,चंद्रकांत कुंभार , डाँ शहाजीराव पवार,उपसरपंच सूरज पवार, माजी सरपंच हणमंत राव पवार ,देणगीदार प्रदिप पवार,डाँ प्रल्हाद पवार, पोपट चव्हाण, उपस्थित होते . तात्या रावजी विद्यालय तडसर या शाखेस२३-२४चा आदर्श विद्यालय कर्मवीर पारितोषिक व समाजभूषण बाळकृष्ण मोहिते पुरस्कार मिळाल्याबदल यथोचित गौरव करण्यात आला . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व देणगीदारांचा सत्कार करण्यात आले.
डाँ जाधव म्हणाले की माणसाच्या जीवनात आयुष्य घडवणारी व दिशा देणारी शाळा असते शाळा या दोन अक्षरानीच आपल्या आयुष्याचंच पुस्तक घडवलं आहे.आज या शाळेची ७५वर्षाची वाटचाल सुरु झाली आहे.माजी विध्यार्थ्यांनी या शाळेच्या भौतिक सुविधा पुर्णत्वासाठी दोन दोन थेंबाची का होईना सढळ हाताने मदत करावी
याप्रसंगी माझ्या मातोश्री, विमल धनाजी जाधव यांच्या हस्ते 51हजार, विद्यालयातील कमवा आणि शिका विद्यार्थी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला स्वर्गीय धनाजीराव चंद्रजी जाधव यांच्या स्मरणार्थ ,बक्षीस म्हणून ठेव व रक्कम वर्ग खोल्या रंगवण्यासाठी आजोबा स्वर्गीय चंद्रजी शिदोजी जाधव यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी माजी विद्यार्थी, उधोगपती संजय भगत यांनी 50 हजार देणगी,
माजी विद्यार्थी, माजी रयतसेवक श्रीमती शोभाताई जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 51 हजार रुपये ठेव सुपूर्द केली
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक हणमंतराव बागल यांनी केले. समिक्षा गिडडे, विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामस्थ, देणगीदार इ उपस्थित होते. सूत्रसंचलन दिपाली सुर्यवंशी व योगेश जगताप यांनी केले आभार सूरज पवार यांनी मानले

Leave a Comment

और पढ़ें