Search
Close this search box.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांचे संचालक पद रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांचे संचालक पद रद्द

प्रतिनिधी -अतुल काळे

चुलत्या पुतण्याच्या कारभाराने घेतला दिवाणजीचा बळी : महादेव पाटील

सांगली/तासगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळणारे रवींद्र वसंत पाटील यांना सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांनी दणका दिला असून बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चुलत्या – पुतण्याच्या कारभाराने दिवाणजीचा बळी घेतल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या तासगाव बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. बाजार समितीच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात झालेल्या अपहारप्रकारणी फौजदारी गुन्हा दाखल होत आहे. बाजार समितीला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची असणारी बाजार समिती आता चुलत्या – पुतण्याची झाली आहे.
रवींद्र पाटील हे अराबा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याकडे व्यापारी लायसन आहे. असे असताना त्यांनी शेतकरी गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी बाजार समितीने ते एका कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याकडे व्यापारी परवाना आहे, हे लपवून ठेवले होते. याबाबत बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर रवींद्र पाटील यांचे संचालकपद दि. 23 सप्टेंबर पासून रद्द करण्याचा आदेश श्री. सुरवसे यांनी दिला.
भ्रष्टाचाराचा आरोप करत महादेव पाटील म्हणाले, आम्ही बाजार समितीतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवत आहोत. पाठपुरावा करीत आहोत. बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहे. रवींद्र पाटील हे व्यापारी गटात असताना त्यांच्याबाबतची माहिती बाजार समितीने लपवली. त्यामुळेच त्यांनी शेतकरी गटातून उमेदवारी अर्ज भरला. तेथून ते निवडून आले. बाजार समितीतील हाही एक भ्रष्टाचारच आहे. बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे हे हिमनगाचे टोक आहे. अजून अनेक भानगडी चव्हाट्यावर येणार आहेत. स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळण्यासाठी दोन दिवाणजी आहेत. त्यापैकी रवींद्र पाटील हे एक आहेत. चुलत्या – पुतण्याच्या या दिवाणजीला आज जिल्हा उपनिबंधकांनी दणका दिला आहे.

40 संचालकांच्या हातात बेड्या पडणार : महादेव पाटील महादेव पाटील म्हणाले, बाजार समितीत आजपर्यंत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारास अनेक संचालक जबाबदार आहेत. त्यामुळे या चुलत्या - पुतण्याच्या नादात बऱ्याच संचालकांच्या हातात आगामी काळात बेड्या पडणार आहेत. सुमारे 40 ते 42 संचालकांवर कारवाई होण्याचे संकेत त्यांनी दिले.

दुसरा दिवाणजी कोण…? स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळण्यासाठी दोन दिवाणजींची नेमणूक करण्यात आली आहे, असा आरोप महादेव पाटील यांनी केला. त्यापैकी रविंद्र वसंत पाटील यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. मात्र आर्थिक भानगडी पाहणारा दुसरा दिवाणजी कोण ? याबाबत पत्रकार परिषदेत चर्चा रंगली होती.

Leave a Comment

और पढ़ें