लोक प्रतिनिधी किशोर लोंढे
नवी मुंबई। विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून ज्ञानविकास संस्थेच्या डी. व्ही. एस इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याअनुषंगाने शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचे डोळे, वजन, उंची तपासून आहार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी डॉक्टरांशी चर्चा केली. विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराबाबत पालकांनी विद्यालयाचे आभार मानले.
लायसन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे रुग्णालयाच्या समन्वयक मीना दरवेश, डॉ. सुरेखा शहा व अपोलो हॉस्पिटल, एस. बी. एस एजन्सीतर्फे डॉ. इंद्रजित कनोजिया, डॉ. गणेश खंडागळे, सहायक अपर्णा मोडक, संगीता गायकवाड उपस्थित होते.