Search
Close this search box.

महाविकास आघाडीकडून तासगाव बंदची हाक 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • बदलापूर येथील घटनेचा पडसाद

सांगली/तासगाव : बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून शनिवार दिनांक 24 रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत तासगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात, बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदची हाक महाआघाडी कडून देण्यात आली आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.गट), शिवसेना (उ.बा. ठा. गट), काँगेस, शे.का.प. आणि समविचारी पक्ष तासगाव शहर बंदची हक्क देत आहोत. पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कटोरात कठोर तात्काळ कारवाई व्हावी. अशी भूमिका महाविकास आघाडी कडून घेण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. गटचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेना उ.बा.ठा. गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप माने पाटील, काँग्रेसचे विशाल चंदुरकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें