प्रतिनिधी – अतुल काळे
- सूचना बॅनर लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
सांगली/ तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी , नेहरूनगर , पाचवा मैल परिसरात चोरीच्या वाढत्या घटना घडुन येत असून तासगाव पोलिसांकडून नागरिकांशी संवाद साधत सूचना फलक लावण्यात आला आहे.
तासगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेश करचे, हेड कॉन्स्टेबल अरविंद संकपाळ, जितेंद्र कांबळे, श्री धाबुगडे, श्री माळी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाचवा मैल येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. श्री करचे यांनी ग्रामस्थांना जागरूक राहण्याचे आव्हान केले. त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नका , संशयित कोणी आढळल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना फलकत्वारे पोलिसांनी दिल्या आहेत.
यावेळी पोलीस पाटील सतीश अशोक पाटील, निमणीचे उपसरपंच राजेंद्र घोडके, माजी उपसरपंच आर. डी. पाटील, सांगली जिल्हा दक्षता समितीचे सदस्य विनय सपकाळ, पंडित राजमाने, दिलीप पाटील, विष्णू पवार, संपत राजमाने, वैभव पाटील, सुनील जाधव, महादेव कोथळे, रमेश घोडके, राजू चव्हाण, सचिन मस्के, सुरेश पवार ,विकास सकटे, लखन वाघमारे, आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.