Search
Close this search box.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर ग्रामपंचायत ने केला देशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा घोर अपमान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रोहीदास लहामगे प्रतिनिधी। 

  • दिनांक 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट 2024 रोजी. राजुर ग्रामपंचायत तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांनी राष्ट्रीय ध्वज उभारलेला नसून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याबाबत.

राजुर प्रतिनिधी –भारताचा स्वतंत्र महोत्सव संपूर्ण देशात साजरा होत असताना. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत. राजुर ग्रामपंचायत तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील प्रशासनाने व या ग्रामपंचायत तील लोकनियुक्त सरपंच व तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःची मनमानी करत. राजुर ग्रामपंचायत समोरील ध्वजारोहण खांबावर दिनांक 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले नाही. सर्व शासकीय कार्यालयावर झेंडा फडकविण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले असून देखील. अकोले तालुक्यातील दोन्ही दिवस ध्वजारोहण न करता राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केलेला आहे.
अशाच प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका हातकडांगळे येथील चांदुर ग्रामपंचायत यांनी देखील 13 व 14 ऑगस्ट रोजी कुठल्याही प्रकारे ध्वजारोहण न केल्यामुळे तेथील लोकांच्या मागणीमुळे प्रशासनाने कारवाई करून येथील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, मंडळ अधिकारी, यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे राजुर ग्रामपंचायत तालुका अकोले या ठिकाणीही असाच दुसरा प्रकार घडला असून प्रकारास कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे.
हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सी ओ साहेब. कलेक्टर साहेब. यांना पत्रव्यवहार करून आदेश पारित केले होते. परंतु अकोले तालुक्यातील बी,डि,ओ, साहेबांनी राजुर ग्रामपंचायतला ते आदेश पारित केले की नाही यातच शंका वाटते. तरीही जिल्हा परिषदेच्या सी ओ यांचे आदेश देखील या ठिकाणी पायमल्ली तुडवले असल्यासारखे वाटते. म्हणूनच अकोले तालुक्यातील सर्वात मोठी पेसा ग्रामपंचायत असलेली राजुर ग्रामपंचायत ह्या राजुर ग्रामपंचायत वर 13 व 14 ऑगस्ट रोजी कुठल्याही प्रकारे ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला नाही. याचाच अर्थ या ग्रामपंचायतीला व येथील कर्मचाऱ्यांना देशाविषयी अजिबातच अभिमान नसल्याचे स्पष्ट होते. अशा या सर्व कर्मचाऱ्यांवर व राजूर ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, व ह्या ग्रामपंचायत मध्ये असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, यास जबाबदार धरण्यात यावे. या सर्वांवर राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याबद्दल राज द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित या सर्वांना त्यांच्या पदावरून पाय उतार करून सर्वांचे निलंबन लवकरात लवकर व्हावे. अन्यथा शासनाने या पदाधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही. तर लवकरच अकोले तालुका बी,डि,ओ, कार्यालयावर मोठ्या संख्येने धरणे आंदोलन, बेमुदत उपोषण, व आत्मदहन यासारखे आंदोलने केली जातील. याची दखल आपण घेऊन लवकरात लवकर दोषींवर कारवाई करून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असी मागणी भारतीय मिडीया फाउंडेशन अकोले तालुका कमेटी ने केली आहे.
या प्रसंगी निवेदन वर रोहीदास लहामगे, सचिन मुतडक, जयराम धादवड, संतोष मुतडक, विजय हेकरे, राहुल मुतडक, अमित पवार, राजेंद्र वाघ, यांच्या साक्षरी आहेत.

Leave a Comment

और पढ़ें