Search
Close this search box.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महीलांनी लाभ घ्यावा : संजयकाका पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली /तासगाव : तासगाव नगरपरिषद तासगाव येथे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सविस्तर आढावा बैठक पार पडली. राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी यापुर्वी बऱ्याच योजना सुरु केल्या. याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली. तासगाव तालुक्यातील पात्र महिलांसोबतच अजूनही या योजनेपासून वंचित असणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ घ्यावा. यातून गरीब, होतकरु व दुर्लभ घटकातील महिलांनी लाभ घेणे गरजेचे आहे. असे आवाहन माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगाव तालुक्यातील ४० हजारपेक्षा जास्त महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या असून अजूनही महिलांच्या नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असलेबाबत गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी नमूद केले.
तहसिलदार अतूल पाटोळे यांनी तासगाव तालुक्यात झालेल्या पात्र महिलांसोबतच राहिलेल्या महिलांपर्यंत आपण पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना सुचना केल्या व आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य साहेबराव पाटील, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य प्रदिप पवार, युवानेते प्रभाकर बाबा पाटील, मुख्याधिकारी पृथ्विराज पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, जाफर मुजावर अनिल कुत्ते, हनमंत पाटील, सुभाष देवकुळे, नवनाथ पाटील, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें