Search
Close this search box.

पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई प्रतिनिधि राजेंद्र बाघ

मुंबई (महाराष्ट्र)। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील खुल्या प्रवर्गातील पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संदर्भातील निर्णय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीत घेण्यात आला होता. ही सूत गिरणी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ च्या तरतुदीनुसार झोन १ मध्ये येत असल्याने या सूतगिरणीस अर्थसहाय्यासाठी ५:४५:५० या सुत्रानुसार निवड करण्याचा प्रस्ताव होता.

Leave a Comment

और पढ़ें