Search
Close this search box.

ब्राह्मण सभेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ ब्राह्मण सभा तासगाव आणि लक्ष्मीनारायण पतसंस्था तासगाव यांच्या सौजन्याने संपन्न झाला. विष्णू मंदिर तासगाव येथे घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद जोग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सरस्वतीची उपासना करायला हवी. अवांतर वाचन, पाठांतर, समाजात घडणाऱ्या घडामोडी याकडे लक्ष द्यायला हवे. पूर्वी घरात शुभंकरोती, स्तोत्रे म्हटली जात असत. आजच्या पिढीनेही ही परंपरा पुढे चालू ठेवायला हवी. याचे फायदे निश्चितच होतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाध्यक्ष पद्माक्ष जोशी यांनी लक्ष्मीनारायण पतसंस्थेबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांच्या वतीने रुद्र हंचनाळकर याने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.के. जोशी यांनी केले. कार्यक्रमास ब्राह्मण सभा तासगावचे अध्यक्ष ॲड. ए.पी. कुलकर्णी, जगदीश कालगावकर, सुनील जोशी, अथर्व जोशी, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी, ब्राह्मण समाज बांधव, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजीत जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें