Search
Close this search box.

सावळसिद्ध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी पाटील, उपाध्यक्षपदी इंदुताई पोळ यांची बिनविरोध निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सावळसिद्ध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी पाटील, उपाध्यक्षपदी इंदुताई पोळ यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी -अतुल काळे

सांगली/तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटी, लि. सावळज संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजी जयगोंडा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ. इंदुताई जगन्नाथ पोळ यांची बिनविरोध निवड झाली असून निवडणूक अधिकारी म्हणून सौ. पि.ए. घोरपडे, सहकार अधिकारी, तासगाव यांनी कामकाज पाहिले.
सोसायटीचे मावळते अध्यक्ष दत्तात्रय पाटील आणि उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुदत संपताच संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत संस्थेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या शतकपूर्ती वर्ष निमित्ताने शताब्दी महोत्सव सुरू आहे. संस्थेचे संस्थापक रामगोंडा पाटील यांचे नातू शिवाजी पाटील यांना शताब्दी महोत्सवात कालावधीत अध्यक्ष होण्याचा मान मिळाला तर संस्थेच्या इतिहासतील पहिली महिला उपाध्यक्ष होण्याचा मान सौ. इंदुताई जगन्नाथ पोळ यांना मिळाला आहे. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शताब्दी महोत्सवाच्या वाटचाली सोबत संस्थेचा नावलौकिक यापुढेही कायम राहावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यानिवड प्रसंगी पॅनल प्रमुख ऋषिकेश बिरणे, मावळते अध्यक्ष दत्तात्रय पाटील, मावळते उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संचालक प्रशांत कुलकर्णी, प्रदीप माळी,संदीप माळी, विनायक पवार, विलास तोडकर,राजेंद्र वांडरे, विजय पाटील, शिवाजी पाटील,बाळासो निकम, राजेंद्र सावळजकर, बंडू पाटील, विनेश पोळ, शिवाजी बुधवले तसेच सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें