Search
Close this search box.

ताब्यातील आरोपी सोडून देणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा धरणे आंदोलन : बहिणीच्या मृत्यूनंतर भावाची तळमळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : बहिणीच्या आत्महत्ये प्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपांना पोलीस कर्मचाऱ्यांनी सोडून दिले बाबत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा दिनांक 15 जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा विजय धनवडे यांनी दिला आहे.

तासगाव पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, माझी बहीण शितल हिचा मांजर्डे येथील सतीश मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. बहिणीला मूल होत नाही तसेच इतर कारणांवरून पती, सासू ,दीर आणि नणंद यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. 8 जुलै 2024 रोजी शितल हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार नोंदवण्यास मी तासगाव पोलीस ठाणे मध्ये गेलो असता रक्षाविसर्जनानंतर तक्रार दाखल करा असा सल्ला पोलिसांनी मला दिला.

11 जुलै रोजी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असता ठाणे अंमलदार माझ्या तक्रारीकडे संथ गतीने कामकाज करीत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे म्हणाले की, प्रथम आरोपींची चौकशी करू.तक्रार नंतर घेऊ.

आरोपींना केवळ ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी दीर सचिन याचा जबाब नोंदवून घेऊन तर सासू आणि ननंद यांना सायंकाळी अटक करता येत नाही या कारणास्तव सोडून देण्यात आले. केवळ पती सतीश यालाच अटक करण्यात आली. उर्वरित तीन आरोपींना सोडून देण्यात आले. महिला आरोपींना अटक करण्यात येईल असा शब्द पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिला होता. परंतु अद्याप आरोपींना अटक झाली नसून पोलीस ठाण्यातून सोडून देणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा 15 जुलै पासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन उभारणार असल्याचे विजय धनवडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

Leave a Comment

और पढ़ें