Search
Close this search box.

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराचा ग्रंथ भेट उपक्रम…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

  • कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबकला 135 पुस्तक भेट

एका वाचनालयाने दुसऱ्या वाचनालयाला ग्रंथ भेट देणं ही दुर्मिळ गोष्ट, ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्ती प्रमाणे श्री रामेश्वर वाचन मंदिर वाचनाल आचराने “ग्रंथ भेट व वाचनालय भेट” उपक्रमा अंतर्गत कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ कार्यवाह प्रशांत मेहेंदळे यांचें जवळ १३५ ग्रंथ, पुस्तके सुपूर्त केले.

यावेळी श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन (दादा) बापर्डेकर, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश परुळेकर, विरेंद्र पुजारे, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, कर्मचारी महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण.

कै. गाडगीळ गुरुजी वाचनालय त्रिंबकचे ग्रंथपाल-अमेय अरविंद लेले, सहाय्यक ग्रंथपाल-विवेक मल्हार जाधव, लिपिक- चैताली चंद्रकांत गोसावी, शिपाई-चैताली विश्वनाथ सुतार आदी उपस्थित होते.

कै. गाडगीळ गुरूजी वाचनालय अध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांनी स्वागत व आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें