Search
Close this search box.

गॅस्ट्रोची व कॉलराची साथ नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना राबवा. संग्रामसिंह देशमुख.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली /रिपोर्टर हेमंत व्यास.

  • संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामीण रुग्णालयास भेट.

कडेगांव येथे गॅस्ट्रोची व कॉलराची साथ आली असल्याचे समजताच कडेगाव ग्रामीण रुग्णालयास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भेट दिली या वेळी डॉक्टर्स व सर्व स्टाफशी चर्चा करून सिव्हिल सर्जन डॉ. विक्रम कदम यांना दूरध्वनीवरून संपर्क करून आरोग्य संदर्भातील सर्व यंत्रणेबाबत माहिती घेऊन रुग्णसंख्या वाढल्यास कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी काही कमी पडल्यास तात्काळ पुरवण्याविषयी सूचना करून गॅस्ट्रोची साथ नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केल्या.

यावेळी कडेगाव ग्रामीण रुग्णालयातील गॅस्ट्रो व कॉलरा बाधीत रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस देशमुख यांच्याकडून करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओढ्यावरील दोन्ही विहिरी शेजारी झाडे वाढली असल्यामुळे विहिरीत खराब पाणी जाऊन विहिरीतील पाणी खराब होत असल्यामुळें कडेगांव नगरपंचायत यांच्या वतीने ओढा खोलीकरण व विहिरी जवळील स्वच्छता कामाची पाहणी तसेच गेस्ट्रोची व कॉलराची साथ आटोक्यात आणण्यासाठी चाललेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती घेऊन आरोग्य, पाणीपुरवठा, सर्व प्रभागातील नगरसेवक यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी केल्या.

यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, सभापती विजय गायकवाड, निलेश लंगडे, नगरसेवक पै. अमोल डांगे, विजयसिंह खाडे, युवराज राजपूत, दादासाहेब गायकवाड, प्रकाश शिंदे आण्णा, विलास धर्मे, राकेश जरग, सुधाकर चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन