Search
Close this search box.

सीसीटीव्ही कॅमेरा बाबत हेल्पिंग हँडस् फाउंडेशनची आक्रमक भूमिका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सीसीटीव्ही कॅमेरा बाबत हेल्पिंग हँडस् फाउंडेशनची आक्रमक भूमिका

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव शहरातील बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत यासाठी तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, तासगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. यासंदर्भात मागील आठवड्यात अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार तासगाव पोलीस यांच्याशी चर्चा होणे महत्त्वाचे आहे.
त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांना निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत अन्यथा हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी निलेश दीक्षित, विशाल शिंदे,सुशांत पैलवान, अथर्व जोशी, सुधीर रसाळ, श्रीकांत गायकवाड, अनिरुद्ध सुतार, आदित्य माळी, विजय घोडके, राजू मुल्ला, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन