Search
Close this search box.

बी.एम.एफ. चे ज्येष्ठ पत्रकार हेमंत व्यास यांना पितृशोक कडेगाव येथील डॉ. हणमंत व्यास यांचे वृद्धापकाळाने निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : कडेगांव जिल्हा सांगली येथील जुन्याकळतील वैद्य म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. हणमंत नरहर व्यास (वय९४) यांचे वृद्धापकाळाने दि. १३ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले- मुली, सूना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन दि. 16 जून रोजी सकाळी नऊ वाजता कराड रोड वरील वैकुंठधाम, कडेगांव येथे होणार आहे.
रुग्णाच्या हाताची नाडी परीक्षण करून रोगाचे निदान करण्यात त्यांचा हातखंडा होता. माणसात देव पाहून आयुष्यभर जनसेवा त्यांनी केली.
कडेगाव शहरासह तालुक्यात ही त्यांची ख्याती होती. प्रसंगी पदरमोड करून रुग्णाला उपचार दिलेल्या अनेक घटना उपस्थितांनी बोलून दाखवल्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग होता. कै. डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार मोहनराव कदम यांचे ते सहकारी होत. सोनहिरा सह. दूध संघाचे चेअरमन म्हणून त्यानी काम पाहिले होते. श्रीराम मंदिराचे माजी अध्यक्ष, ब्राह्मण समाज कडेगांव चे ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती.
डॉ. व्यास यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे मेडिकल असोसिएशन कडेगांव यांच्या वतीने सांगून श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यविधी प्रसंगी कडेगांव मधील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावत व्यास कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Leave a Comment

और पढ़ें