Search
Close this search box.

दारूबंदी असूनही दारूबंदी चर्चा कशासाठी ?, नक्की गावाचा विकास होण्यासाठीच का ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -: सचिन मुतडक
अंतर्गत हप्ते वाढविण्यासाठी तर नाही ना ?
राजूरकरांसमोर पडलेला गुपित प्रश्न….

दिनांक. ३१/०५/२०२४ वार शुक्रवार रोजी नियोजित प्रमाणे, राजुर ग्रामपंचायत ची ग्रामसभा सुरू झाली. या ग्रामसभेमध्ये अनेक विषयावर चर्चा होत असताना, ऐन वेळेच्या विषयांमध्ये दारूबंदीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दिनांक ३०/०५/२०२४ रोजी ग्रामपंचायत सदस्यांच्या मीटिंगमध्ये दारूबंदीचा विषय निघाला, त्यावर सरपंच/उपसरपंच यांनी तडका फडके निर्णय घेत, दारू विकणाऱ्यांवर त्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणांवर हल्लाबोल केला. हा हल्लाबोल करत असताना कुणाकडेही दारू सापडली का नाही. अचानक कोणालाही माहीत नसताना गेलेले सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांना कुणालाही कुठेही दारू का सापडली नाही. असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत असून, ही दारू न सापडण्यामागं ह्या दारू विक्रेत्यांना कोणी फुटीरवादींनी आधीच टीप तर दिली नाही ना ? एकही दारूची बाटली न सापडणे म्हणजेच ह्या दारू विक्रेत्यांना या हल्लाबोल मोर्चा येण्याआधीच पूर्वसूचना मिळाली तर नसेल ना ? अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू.

ग्राम सभेमध्ये दारूबंदी विषयावर चर्चा होताना, ज्यांनी दारूबंदी केली त्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित नव्हते. दारूबंदी करण्यामागचा नक्की हेतू काय ? इतक्या वर्षापासून दारूबंदी असून देखील गेली वीस वर्षापासून गावात दारू चालूच आहे. परंतु नेमकं असं काय घडलं की सर्वजण इतके आक्रमक होऊन दारूबंदी या विषयावर निर्णयक भूमिका घेण्यास तयार झाले.
अनेक ग्रामसभांमध्ये दारूबंदी या विषयावर चर्चा नेहमीच होते. परंतु आजच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदी हा विषय खूप महत्त्वाचा ठरला असून, सरपंच/उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी सर्वांनी दारूबंदी विषयी आवाज उठविला. ही अतिशय चांगली गोष्ट असून, सर्व राजूरकरांना देखील दारू ही बंदच झाली पाहिजे. असा प्रतिसाद मोठ्या जल्लोषात दिला. परंतु प्रत्येक वेळेस दारू बंदी हा विषय तात्पुरता होतो. व पुन्हा नव्या जोमाने व जास्त किमतीने लोकांना दारू विकली जाते. याला देखील जबाबदार कोण असेल. हा देखील संतप्त सवाल ग्रामसभेमध्ये काही नागरिकांनी उपस्थित केला. जर दारूबंदी करायचीच असेल तर गावामध्ये एक बाटली सुद्धा मिळता कामा नये. जणूकाही संपूर्ण गावामध्ये एक नवचैतन्य आज राजुर गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळालं.

खरंच दारू बंद होणार का ? या विषयावर अनेक तरुण व काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असता, त्यांच्या म्हणण्यात देखील खूप तथ्य आढळून आले आहे. अनेक वेळा दारूबंदीचे निर्णय झाले तरीही दारू बंद होत नाही. तर हप्ते वाढविले जातात. आणि पुन्हा दारू विकली जाते. परंतु आजचा जो निर्णय झाला या निर्णयानुसार जर राजूरमध्ये कायमची दारूबंदी झाली नाही. आणि पुन्हा दारू विक्री चालू झाली तर काही संतप्त नागरिकांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया सांगितले की…. *आडवी बाटली उभी करा. नाहीतर राजुर मधून कायमची दारू हद्दपार करा….* असा सवाल अनेक नागरिकांनी ग्रामसभेच्या शेवटी उठवला. या मागचं कारण विचारलं असता अनेक तरुणांनी असं देखील सांगितलं की, ही अवैद्य दारू जणू काही लोकांसाठी विषच आहे. अतिशय निकृष्ट दर्जाची स्पिरिटची दारू विकली जाते. त्यामुळे जे कोणी तरुण दारू पितात यांचे आयुष्य कमी होत चालले आहे. त्यापेक्षा नियमांनुसार दारू चालू झाली तर किमान चांगल्या प्रतीची दारू लोकांना प्यायला मिळू शकते. या मागचं कारण विचारलं असता, तरुणांनी सांगितलं की दारू पिणारा हा कुठूनही दारू आणून पिणारच. ज्या ठिकाणी अर्धी बाटली प्यायची त्या ठिकाणी तो तीन चार बाटल्या घेऊन येतो म्हणजेच दारू बंदीमुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण देखील या भागांमध्ये वाढलेले दिसून येत आहे. अशी माहिती काही तरुणांनी मांडली ग्रामपंचायत यांनी आज ग्राम सभेमध्ये घेतलेल्या निर्णयाला सर्वांनीच प्रतिसाद दिलेला असून गावकऱ्यांप्रती ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच व सर्व सदस्य हे दारूबंदीचा विषय तडीस नेतील का ? त्यांनी दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळतील का ? राजूर गावातून दारू हद्दपार होईल का ?
जर दारू बंद झालीच नाही तर संपूर्ण गावातून मतदान घेऊ आणि *आडवी बाटली उभी करू* करा अशा घोषणा देखील काही तरुणांनी ग्रामसभा संपल्यानंतर दिल्या.

शेवटी राजुर पोलीस स्टेशनचे ए,पी,आय, सरोदे साहेबांनी देखील या दारूबंदी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. व अनेक वर्षापासून चालू असलेल्या दारू विक्रीने राक्षसी अवतार धारण केलेला आहे. आणि हा राक्षसी अवतार जर आपल्याला संपवायचा असेल. तर सर्व गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतच्या सहकार्याने एकत्र येऊन आपण सर्वजण मिळून. हा अनेक वर्षाचा राक्षस ठेचून काढू. व सर्वतोपरी दारूबंदी करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली.

*शेवटी नागरिकांमधून एकच सूर आला राजुर गावामधून दारू हद्दपार करा नाहीतर आडवी बाटली उभी करा…*

Leave a Comment

और पढ़ें