Search
Close this search box.

तळेरे येथे रविवारी शारदीय स्मृतिजागर : प्राचार्य शरद काळे स्मृती दिनाचे औचित्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब 

खारेपाटण विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा कथाकार, ललितलेखक, कवी शरद काळे यांच्या व्दितीय पुण्यस्मृती निमित्त ‘शारदीय स्मृतिजागर’ हा विशेष कार्यक्रम रविवारी 26 मे रोजी तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिक्षण, साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी शारदीय प्रतिष्ठान खारेपाटण या संस्थेची स्थापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6.30 वा. होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संवाद परिवाराचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.

 

लोकप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या काळे सरांनी शैक्षणिक क्षेत्रासह उत्तम कथाकार, ललितलेखक, कवी व जाणकार म्हणून साहित्य क्षेत्रातही दर्जेदार कामगिरी केली. त्यांच्या व्रतस्थ कार्याचे समाजऋण म्हणून या कार्यक्रमाच्या रूपाने त्यांना ‘कृतज्ञ स्मरणांजली’ अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद लाभले असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वर्षा शरद काळे असणार आहेत.

तर यावेळी काळे सरांचे विविध क्षेत्रातील शिष्य आणि सहकारी यांना प्रतिनिधी म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. मदन हजेरी, श्रीकृष्ण शंकर पाटणकर, वैशाली पंडित, संजय देसाई तसेच

अशोक नवरे, योगिनी रानडे, ए. डी. कांबळे, अनिल देवस्थळी, संतोष रानडे, दिपा ठाकूरदेसाई, परवेज पटेल, किशोर माळवदे, डॉ. उमेश बालन, डॉ. प्रसाद मालंडकर, डॉ. अनिल धाकु कांबळी, अपूर्वा नानिवडेकर, दादा मडकईकर, उषा परब, डॉ. सई लळीत, वीरधवल परब, मोहन कुंभार,रश्मी कशेळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शरद काळे यांच्या कथा, ललितलेखन व कवितांचे वाचन वामन पंडित, प्रसाद घाणेकर, डॉ. ऋचा कुलकर्णी, डॉ. मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. तर शिक्षण, साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी शारदीय प्रतिष्ठान, खारेपाटण’ या संस्थेची स्थापना चारुता शरद प्रभुदेसाई, डॉ. अनुजा जोशी, कपिल काळे हे तिघे करणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाला साहित्य प्रेमींनी, शरद काळे सरांच्या शिष्य आणि प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें