Search
Close this search box.

जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांची जयंती….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

तळेरे येथे अभिवादन व विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवार दि. १८ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील “मधुकट्टा” येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण कवी, गझलकार प्रमोद कोयंडे करणार आहेत.

१८ मे हा दिवस म्हणजे स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म दिवस तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने दर वर्षी त्यांच्या उपस्थितीत तळेरे येथे साजरा केला जात असे. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात येते. तसेच त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण कवी,गझलकार प्रमोद कोयंडे करणार आहेत. हा कार्यक्रम मधुकट्ट्यावरील अभिवादनानंतर श्रावणी कॉम्प्यूटर सेंटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रज्ञांगन आणि संवाद परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

तरी याप्रसंगी संवाद परिवारातील सदस्य तसेच मधुसूदन नानिवडेकर यांच्या चाहत्या साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन प्रज्ञांगन आणि संवाद परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन