Search
Close this search box.

आचरा येथील नृत्य कार्यक्रम आयोजक/नियोजक विजय ऊर्फ बाबू कदम यांचा चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने सत्कार…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे सुपूत्र असलेल्या श्री विजय ऊर्फ बाबू कदम यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध रंगकर्मी साईनाथ जळवी यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला अवार्ड शो म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा समाज हॉल कुडाळ येथे दि.२९ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांसह रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, श्री नाईक, श्री पावसकर, चिमणी पाखरचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष श्री रवि कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आचरा वरचीवाडी येथील विजय ऊर्फ बाबू कदम नृत्य क्षेत्रात मागील 25 वर्षा पासून कार्य करत असून सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रणी असतात. चिमणी पाखरं या संस्थेने केलेल्या सत्कारा बद्दल विजय उर्फ बाबू कदम त्यांच्यावर आचरा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें