विशाखा समिती पुढे स्त्रियांनी निर्भयपणे यावे : ॲड.ऋतुजा गुरव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : “सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार 19 सप्टेंबर 2006 च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सर्व कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण किंवा विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अत्याचार पीडित महिलांनी या समितीसमोर निर्भयपणे आपली समस्या मांडावी. महिलांवर होणारे लैंगिक छळ व अत्याचारास प्रतिबंध व्हावा, यासाठी विशाखा समिती कार्य करते” असे प्रतिपादन ॲडव्होकेट ऋतुजा गुरव (तासगाव तालुका कोर्ट तासगाव) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनींना केले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथील आयोजित महिला तक्रार निवारण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला तक्रार निवारण जनजागृती वर आधारित निकिता शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वामी विवेकानंद व डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहल पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा प्रास्ताविकातून सांगितली. सफिना मूल्ला यांनी प्रमुख वक्त्या ॲड.ऋतुजा गुरव यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ‘महिला तक्रार निवारण समिती कार्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान ॲड.गुरव यांनी दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थिनींना कोणत्याही अत्याचारास विरोध करण्याचे आवाहन केले. अर्चना दळवी, राजश्री टोपकर यांनी सूत्रसंचालन तर दामिनी आठवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे यांनी केले.प्रा.डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.डॉ.डी.टी.खजूरकर, प्रा.ए.आर.पंडित,प्रा.पी.एस. शेंडगे,ग्रंथपाल प्रा.ए.जी.पाटील, श्री सुनील कुंभार,सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

और पढ़ें

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्याचे आरमार,शस्त्रे व चंदनाचे हाताचे ठसे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा दस्त पाहण्यासाठी बाल गंधर्व नाट्य मंदिर पुणे येथील प्रदर्शनास पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

🙏जय गुरु देव जय भीम 🙏 अंतराष्ट्रीय महिला दिवस पर 9 मार्च 2025 को छत्तीसगढ़ सर्व रविदास समाज महिला सम्मलेन महिला गठन एवं छत्तीसगढ़ सर्व रविदास समाज जिला इकाई रायपुर का शपथ ग्रहण समारोह प्रायोजक छ. गढ़. सर्व रविदास समाज द्वारा सम्पन किया गया ।  रिपोर्ट -लक्ष्मी बर्वे चेयरमैन महिला सेल छत्तीसगढ़।