प्रतिनिधी – अतुल काळे
- 16 जणांची शेवटच्या दिवशी माघार
- सेटलमेंट बाबत नागरिकात चर्चा
सांगली/तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात 17 उमेदवारात लढत होणार असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 16 जणांनी माघार घेतल्याने त्यांची माघार हा चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 33 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एका विशिष्ट समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण मंजुरीसाठी लढा देण्यासाठी उमेदवाराने अर्ज भरला होता. तर आपण केलेल्या कामाची दखल पक्षाकडून घेतली गेली नसल्याने उमेदवारी जाहीर केली होती. अशा विविध कारणांमुळे उमेदवारीसाठी मोठा कांगावा करत हिरीरीने अर्ज भरला. मात्र अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतल्याने चर्चेत तोंड फुटले आहे.
दिनांक 4 अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 16 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामध्ये संभाजी पाटील- कुमठे, दिगंबर कांबळे- शिरढोण, अर्जुन थोरात- तासगाव, प्रकाश शिंगाडे- घोरपडी, अनिल गावडे- कुमठे, संभाजी माळी- मणेराजुरी, सचिन वाघमारे- कवठेमहांकाळ, युवराज घागरे- ढालगाव, सुरज पाटील- कुची, संजय चव्हाण -मळणगाव, प्रदीप माने- सावर्डे, प्रशांत सदामते -अंजनी, नदीम तांबोळी- सावळज, प्रमोद देवकते – कुपवाड, शिवाजी ओलेकर – अलकुड, संजय चव्हाण – तासगाव अशा 16 जणांनी अर्ज मागे घेतले.
सदर उमेदवारांनी निवडणुकीतून माघार कोणत्या कारणास्तव घेतली? कोणाची सेटलमेंट कोणाशी झाली? याबाबत नागरिकातून उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहे.