Search
Close this search box.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख पदी सचिन शेटे यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सांगली जिल्हा प्रमुख पदी तासगावच्या सचिन शेटे यांची निवड झाली असून तासगाव कवठेमंकाळ क्षेत्रात वैद्यकीय मदत योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याची दखल घेत जिल्हा पातळीवरील जबाबदारी मिळाल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना सर्वच आरोग्य योजनांचा मोफत लाभ मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील अशा रुग्णांना रुग्णालयात राखीव कोट्यातून कॉट उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत होण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी ही निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख राम राऊत यांच्या हस्ते सचिन शेटे यांना देण्यात आले आहे. यावेळी बोलताना श्री. शेटे म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत असून सांगली जिल्ह्यातील एकही गोरगरीब आणि गरजू रुग्ण उपचाराविना राहणार नाही यासाठी प्रयत्न करू. अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य विस्तारक गौरव गुळवणी, कोल्हापूरचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे, महादेव सावंत, नितीन हिलाळ, निलेश गुळवणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें