Search
Close this search box.

नागरिकांनी सतर्क राहून तापाची लक्षणे वाटल्यास डॉक्टरी सल्ला घ्यावा : जिल्हाधिकारी राजा दयानिधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे 

  • बदलत्या वातावरणा मुळे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आवाहन
  • सांगली जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे, साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण 

सांगली : सांगली जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शन आणि साथीचे रोग बळावत असून प्रकृती जपण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. दूषित पाणी आणि अन्नाचे सेवन करू नये असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

बदलत्या वातावरणामुळे सांगली जिल्ह्यामध्ये डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, ताप येणे असे साथीचे रोग बळावत आहेत। या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनात पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच दूषित अन्न सेवन करू नये। डासांपासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत। आपल्या जवळपास पाणी साचून त्यातून डास निर्मिती होणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच तापाची लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता डॉक्टरी सल्ला घेऊन औषधोपचार करावेत. शासकीय दवाखाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. असे आवाहन जिल्हाधिकारी सांगली यांनी केले आहे।

Leave a Comment

और पढ़ें