Search
Close this search box.

सांगली जिल्हा होमगार्ड दलामध्ये सदस्य भरती : जिल्हा समादेशक रितू खोकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली : सांगली जिल्हा होमगार्ड दलामध्ये पुरुष व महिला सदस्यांची भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे होमगार्ड भरतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सांगली जिल्हा होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी केले आहे.
देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण देणे, आपत्कालीन मदत कार्य प्रशिक्षण देणे, कायदा सुव्यवस्था राखणेबाबत माहिती देणे, एक शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा हेतू आहे. होमगार्ड संघटनेच्या माध्यमातून नागरिक निष्काम भावनेने देशसेवा करू शकतात. होमगार्ड संघटनेमध्ये भरती झालेल्या सदस्याला राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दल यामध्ये 5 टक्के जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील सांगली, बुधगाव, तासगाव, आष्टा, मिरज, मालगाव, शिराळा, इस्लामपूर, वाटेगाव, कुरळप, इटकरे, कासेगाव, कडेगाव, आटपाडी, विटा, जत, शेगाव, कवठेमहांकाळ आदी पथक, उपपथक येथील रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी चे ऑनलाइन अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahagh/login1.php या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरता येतील.
भरतीवेळी आयटीआय, जिल्हास्तरीय प्राविण्य खेळाडू, माजी सैनिक, एन.सी.सी. बी आणि सी प्रमाणपत्र धारक, नागरी संरक्षण सेवेचे प्रमाणपत्र धारक, जड वाहन परवाना धारक यांना वेगळे गुण प्राप्त होणार आहेत. उमेदवार किमान दहावी पास असावा. किमान उंची पुरुष (१६२सेमी) महिला (१५० सेमी) असणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी फक्त छाती न फुगविता ७६ सेमी तर कमीतकमी 5 सेमी छाती फुगवता येणे आवश्यक. असे साधारण निकष लावण्यात आले आहेत. अधिक माहिती तसेच भरती प्रक्रियेसाठी जिल्हा समादेशक कार्यालय सांगली यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें