Search
Close this search box.

जायंट्स ग्रुप ऑफ अस्मिता सहेली तासगाव तर्फे दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. जायंट्स ग्रुप ऑफ अस्मिता सहेली तासगाव व चितळे उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 31 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले, दिव्यांग मुले म्हणजे देवाची शक्ती असलेली मुले. या मुलांचं कौतुक आमच्या हस्ते व्हावे हेच आमचे भाग्य.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, स्कूल बॅग,डबा,ट्रॉफी,सर्टिफिकेट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास बीएसएनएल तासगावचे अभियंता किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन शिंत्रे, गट शिक्षण अधिकारी आबासो लावंड, अस्मिता सहेलीच्या किरण किरण हंचनाळकर,अर्चना कुलकर्णी, सुनिता चिपाडे, उमा पाटील, शैला निपाणीकर, वत्सला ढोले, विजया निपाणीकर, छाया बंडगर, अलका बाबर, मंगला इनामदार, दिव्यांग विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें