सांगली /पलुस रिपोर्टर हेमंत व्यास.
- ” स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या शासन सर्वोपोतरी मदत करणार “
सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. घाबरू नका धीर सोडू नका या संकटात माझ्यासह शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे, तुम्ही फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून माझ्यासह राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वोपोतरी मदत करणार असल्याचे आव्हान सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह सिंह देशमुख यांनी केले,
संग्रामसिंह देशमुख यांनी दिवस, रात्री वेळ देऊन पलूस तालुक्यातील अमनापुर,धनगाव, खटाव, वसगडे,चोपडेवाडी, नागठाणे, ब्रम्हनाळ, सुखवाडी, अशा २२ गावांना भेटी देऊन पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा देत शासन यंत्रणे बरोबर संपर्क साधून मदत कार्याला गती देण्याचे कार्य केले. पूर हे निसर्गाचे संकट आहे,पलूस तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये धीर सोडू नये माझ्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी विश्वसंग्राम फाउंडेशन पदाधिकारी या संकटात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. शासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले असल्याचे देशमुख यांनी सांगीतले.
यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.