Search
Close this search box.

बाल कथाकार स्वानंदी कुबल हिचे कथाकथन….! शिडवणे नं. 1 शाळेत ‘एक तास गोष्टींचा ‘संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

आठवड्यातील एक वार मुलांसाठी आनंददायी असावा यासाठी शासनाने शनिवार निवडला आहे. त्यामुळे आता दर शनिवारी शाळांमध्ये ‘ आनंददायी शनिवार ‘ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

शिडवणे नं. 1 शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या शनिवारी ‘ एक तास गाण्यांचा ‘, ‘ एक तास पानांचा ‘, एक तास योगांचा ‘ असे तीन शनिवार साजरे केल्यानंतर चौथ्या शनिवारी ‘ एक तास गोष्टींचा ‘ हा अभिनव नवोपक्रम नियोजनपूर्वक राबविण्यात आला.
कणकवली एस. एम. हायस्कुल प्राथमिक मध्ये तिसरी इयत्तेत शिकणारी बालकथा स्टोरीटेलर कु. स्वानंदी प्रवीण कुबल हिने शाळेचा एक शनिवार ‘ गोष्टींचा ‘ करुन मुलांना थक्क करुन सोडले.
तिने शाळेतील सर्व मुलांना पाच गोष्टी हाव भावयुक्त सांगितल्या. हल्ली मुलांना गोष्टी सांगता येत नाहीत, म्हणून त्यांना एक अनुभवाचा डेमो दाखविण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या उपशिक्षिका सीमा वरुणकर आणि हेमा वंजारी यांनी स्वानंदीचे स्वागत केले.
एकदाचा मुळा उपटला, चिऊ आणि खारुताई, चार बोबड्या मुलींची गोष्ट, दुष्ट साप आणि राजू आणि खोडकर बैल अशा पाच गोष्टींची मुलांना शाब्दिक मेजवानी मिळाली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तिचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें