Search
Close this search box.

दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन गाई म्हैशींसह मोर्चा : दूध दरवाढीची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली-तासगाव : गाई म्हैशी च्या दुधाला मिळणारा अपुरा दर, दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यां चा सामना करणार्‍या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार दि. 3 जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभा करण्यात येत असल्याची माहिती प्रदीप माने पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना दूध उत्पादक संघर्ष समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप माने-पाटील म्हणाले, सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला. सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात 28 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 48 रुपये दर देण्यात येतो. परंतु, यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात असल्याचे श्री. माने पाटील यांनीसांगितले.
याप्रसंगी, समितीचे अध्यक्ष प्रदीप माने -पाटील, पुरण मलमे, विशाल शिंदे, बाहुबली पाटील, सम्मेद पाटील, रमाकांत पाटील, अमित पाटील, अरुण यादव, प्रशांत महाडिक आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन