Search
Close this search box.

सर्पदंश झालेल्या चिमुकल्या कार्तिकला जीवदान डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश : कुटुंबावरील संकट दूर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

सांगली/तासगाव : जगात सर्वात विषारी असणाऱ्या सर्प जाती मधील मण्यार जातीचा सर्प अत्यंत जहाल विषारी मानला जातो. याचा झालेला दंश वेळेत उपचार न मिळाल्यास जीवघेणा ठरतो. मात्र तासगाव परिसरात घडलेल्या घटनेमधे माणुसकी, डॉक्टरांची तत्परता यामुळे 6 वर्षीय कार्तिकला जीवदान मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी, कार्तिक आणि कुटुंबीय दिनचर्या आटोपून रात्री अकराच्या दरम्यान झोपी गेले. रात्री 2 च्या सुमारास कार्तिकला अचानक उलटी, गरगरणे, अंगाला घाम सुटणे असा त्रास होऊ लागला. अचानक होणाऱ्या त्रासामुळे कुटुंबीय भयभीत झाले. कार्तिकला तात्काळ तासगावच्या डॉ. प्रीतम राऊत यांच्याकडे आणण्यात आले. डॉक्टरांनी सलाईन व उपचार केले असता प्रतिसाद मिळाला नाही. कार्तिकच्या तोंडातून फेस येण्यास सुरुवात झाली होती. यावरून डॉक्टरांनी विषबाधा झाली असल्याचा अंदाज बांधून पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटल येथे तात्काळ नेण्यास सांगितले.
दरम्यानच्या काळामध्ये घरातील मांजराने मण्यार जातीच्या सापाला मारून टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे कार्तिकला सर्पदंश झाला असल्याचा अंदाज आला. कानाजवळ सर्पदंश झालेली जागा दिसून आली. स्नेहल सगरे, डॉ.पूजा, डॉ.मृणाल कुलकर्णी, डॉ.सदानंद, डॉ.हर्ष, डॉ. प्रज्ञाद व भारती हॉस्पिटल कर्मचारी यांनी तत्काळ योग्य उपचार पद्धती राबवत कार्तिकला जीवदान दिले. यावेळी रुग्णसेवक निसार मुल्ला यांनी कार्तिकच्या कुटुंबियाना मोलाचे सहकार्य केले. कुटुंबावर आलेली संकट दूर करण्यामध्ये डॉक्टरांचा व रुग्णसेवकाचा मोलाचा सहभाग असल्याने कार्तिकच्या माता पित्यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन