Search
Close this search box.

तासगावात शिवराज्याभिषेक दिनाचा जल्लोष, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक दिन तासगाव मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने वातावरण शिवमय निर्माण झाले होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगावच्या कार्यकर्त्यांकडून राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अग्रभागी ध्वज पथक, ज्वाला पथक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका सजवलेल्या वाहनामध्ये विराजमान करण्यात आला होता. शिवतीर्थ गुरुवार पेठ, गणपती मंदिर, पोस्ट ऑफिस, सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, स्टॅन्ड चौक व पुन्हा शिवतीर्थ अशा मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, फटाक्याची मोठी आतषबाजी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू धर्माच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Leave a Comment

और पढ़ें