Search
Close this search box.

कोर्टातील केसेस तडजोडीने मिटवण्यासाठी मध्यस्थ प्रक्रियेचा अवलंब करावा – अँड. प्रमोद पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली रिपोर्टर -हेमंत व्यास

कोर्टातील केसेस तडजोडीने मिटवण्याचा पक्षकारांनी प्रयत्न करावा असे मत कडेगांव तालुका वकिल संघटना अध्यक्ष अँड. प्रमोद पाटील यांनी मांडले.
कडेगांव तालुका विधी सेवा समिती व कडेगांव तालुका वकिल संघटना यांचे वतीने कडेगांव कोर्ट येथे मेडीऐशन (मध्यस्थ)या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,आपल्या देशात कोर्टात अनेक केसेस प्रलंबित आहेत त्यामुळे चालू केसेस मध्ये लोकांची तडजोड करण्यासाठी कोर्टा मार्फत मध्यस्थ नेमणूक केली जातेय.यामुळे खूप केसेस मध्ये तडजोडी होऊ लागलेल्या आहेत.. त्यामूळे लोकांनी मध्यस्थ पद्धतीचा अवलंब करावा अशी विनंती त्यांनी केली.केस तडजोडीने मिटली तर दोन्ही पक्षकरांचा विजय होतो,पैसे,वेळ वाचतो,संबंध चांगले राहतात.
यावेळी मध्यस्थ या विषयावर ॲड.मनोज इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले.ते महणाले की,कोर्टा मार्फत एकाद्या केस मध्ये मध्यस्थ नेमणूक करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे.तसेच मध्यस्थ मार्फत केस मिटली तरी त्या हुकुमाची अंमलबजावणी कायदेशीर पणे होते.कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी सुद्धा कोर्टात एक अर्ज करून पुढील पार्टीला कोर्टात बोलवून घेता येते व ती तक्रार केस दाखल करण्यापूर्वी सुद्धा कोर्ट मार्फत मध्यस्थ नेमून तडजोड करता येऊ शकते. तसेच सदरची तडजोड कायदेशीरपने अंमलबजावणी होऊ शकते.
यावेळी कडेगांव न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम आर पाटकर, सह दिवाणी न्यायाधीश श्री सी आर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हजर होते.
तसेच यावेळी ॲड. किरण उथळे, ॲड.रमेश सावंत, ॲड.सुनील पाटील, ॲड.रोहित मदने, ॲड.सपना बोडरे ॲड.आसावरी मोहिते, ॲड.सुभाष माने व ॲड.असिफ आगा तसेच तालुक्यातील विविध गावचे लोक हजर होते.आभार अँड.कपिल हजारे यांनी मानले.*

Leave a Comment

और पढ़ें