Search
Close this search box.

दी.३०/०५/२०२४ च्या मासिक मीटिंग मध्ये निर्णय व लगेच दरुविक्रेत्यानवर हल्लाबोल मोर्चा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -: सचिन मुतडक
पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना बांगड्या दाखवणे कितपत योग्य…

राजुर ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या मासिक मीटिंगमध्ये दारूबंदी या विषयावर चर्चा सुरू असताना, सर्वांनी एकमताने दारू ही बंद झालीच पाहिजे. या दृष्टीने मीटिंग संपताच दारू विक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल मोर्चा नेला. परंतु एकही बाटली कुठल्याही दारू विक्रेत्याकडे सापडली नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला व नवीनच चर्चेला उधाण आलं. जणू काही फुटीरवादींनी या हल्लाबोल मोर्चाची या दारू विक्रेत्यांना आधीच माहिती दिली असावी. त्यामुळे कुठेही एकही बाटली सापडली नाही. सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या दारू विक्रेत्यांना चांगलाच जाब विचारला आणि तंबीही दिली. जर इथून पुढे दारू विकली तर आम्ही तुमचे दारूचे अड्डे उध्वस्त करून, तुमच्या घराची वीज, नळ कनेक्शन कट करू व तुम्ही केलेले अतिक्रमण देखील आम्ही त्याच क्षणी काढून टाकू. अशा प्रकारे सिंघम स्टाईलने सरपंच/उपसरपंच व सर्व सदस्यांनी अतिशय मार्मिक असा हल्ल्या मोर्चा दारू विक्रेत्यांवर नेल्यामुळे दारू विक्रेत्यांचे खरोखर धाबे दणाणले. आणि राजुर मधून दारूबंदी या विषयी चर्चेला उधाण आले. त्यानंतर हा मोर्चा राजुर पोलीस स्टेशनवर नेण्यात आला हा मोर्चा नेल्यानंतर राजुर पोलीस स्टेशनचे ए,पी,आय, सरोदे साहेबांनी या सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देखील अतिशय व्यवस्थितपणे सर्वांचं समाधान केलं. आणि खरोखर त्यांनी सांगितलं की दारू विक्रेता हा आज तयार झाला नसून, गेले वीस वर्षापासून ह्या राजुर गावांमध्ये दारू विकत आहे. गेल्या वीस वर्षापासून हा राक्षस खूप मोठा झाला आहे. हा राक्षस जर ठेचायचा असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन, या राक्षसाला ठेचावा लागेल. सरोदे साहेबांनी देखील त्यांची स्पष्ट भूमिका अतिशय नम्रपणे सर्व सर्वांसमोर मांडली.

*पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना बांगड्या दाखवणे कितपत योग्य*

यामध्ये काही महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये बांगड्या दाखविल्या, परंतु ह्या बांगड्या दाखवणं हे योग्य आहे का ?
राजुर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांचा विचार केला असता. या सर्वांवर राजूरच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांची जबाबदारी देखील आहे. त्यांच्यासमोर फक्त राजुरची दारूबंदी हाच एकमेव विषय नसून, अनेक ठिकाणी निर्माण होणाऱ्या विविध समस्या मारामाऱ्या होणे, आत्महत्या होणे, पाण्यात पडणे, हाफ मर्डर होणे, घरगुती भांडण होणे, अशा विविध प्रकारच्या तक्रारी राजुर पोलिसांकडे येतात. या सर्वांना तोंड देताना राजुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची खरोखर कसरत होते. याला कारण म्हणजे इथं कमी असलेला स्टाफ. व या पोलिसांसमोर मोठ्या प्रमाणावर असलेली हद्द (परिसर) या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम राजुर पोलीस स्टेशन मधून होत असतं. आता काजवा महोत्सव चालू आहे. ह्या काजवा महोत्सवांमध्ये रात्र रात्रभर पोलिसांना पेट्रोलियम करावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील येऊन ड्युटी करावी लागते काही काही पोलीस तर २४/२४ तास देखील ड्युटी करतात. ज्या माता-भगिनींचे भांडण होतात त्या माता भगिनींच्या नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये देखील त्या भगिनींना पोलीस दादाचाच आधार घ्यावा लागतो. आणि अशा आपल्या सर्वांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना बांगड्या दाखवणं कितपत योग्य आहे. याचा देखील विचार महिला वर्गाने केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा 45 लाख पोलीस रात्रभर पहारा देतात तेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण निवांत झोपत असतो. याची जाणीव सर्वसामान्य नागरिकाला राहिलेली नाही का ? पोलिसांचे हात देखील बांधलेले असून सात वर्ष गुन्ह्याच्या शिक्षेत पोलिसांना कोणालाही अटक करता येत नाही. याआधी पोलिसांनी ह्या दारू विक्रेत्यांवर अनेक कारवाया केलेल्या आहे. तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये ज्या दारू विक्रेत्याकडे दारू सापडेल त्याची घरपट्टी, नळ कनेक्शन, वीज कनेक्शन व अतिक्रमण काढण्याचे ठराव देखील पास केले आहे. परंतु आजपर्यंत हे ठराव अमलात आल्यानंतर ज्यांची दारू पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्या गुन्हेगारांच्या घरांवर ग्रामपंचायतीने किती जणांचे नळ कनेक्शन वीज कनेक्शन व अतिक्रमण काढली का याकडे देखील ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

दारूबंदी याविषयी सरपंच/उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व अनेक महिला भगिनी, व गावकरी, यांनी केलेल्या अचानक हल्लाबोल मोर्चामुळे दारू विक्रेत्यांचे खरोखर धाबे दणाणले. त्यामुळे या सर्वांचे संपूर्ण राजुर गावातूनच नव्हे तर तालुक्यातून कौतुकाची थाप राजूर ग्रामपंचायतीला मिळत आहे… तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नक्कीच राजुर गावाची पुन्हा दारूबंदी होईल अशी अशा निर्माण झाली आहे.

Leave a Comment

और पढ़ें