Search
Close this search box.

श्रेया चांदरकरने साकारले रंगीत धाग्यांपासून गौतम बुद्धांचे आकर्षक चित्र….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

आज २३ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने रंगीत धाग्यांपासून तयार केलेले तथागत गौतम बुद्धांचे चित्र सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे , हे चित्र बनवण्यासाठी तिला सहा दिवसांचा कालावधी लागला.
संपूर्ण जगाला प्रेम,अहिंसा,सत्य शांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण वैशाख पौर्णिमेदिवशीच झाला असल्याने बुद्ध पौर्णिमा या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आज सर्वत्र बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून साजरी केली जाते, भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. बुद्ध पौर्णिमा हा सण भारतात आणि जगभरात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, ज्याला “बुद्ध जयंती” असेही म्हणतात.
. दरम्यान श्रेया चांदरकर हिच्या या अप्रतिम कलेबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें