Search
Close this search box.

*चिंदर कुंभारवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली मॅनग्रोव्ह सफर….! सिंधुदुर्ग- विवेक परब।

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिंदर कुंभारवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली मॅनग्रोव्ह सफर….!

सिंधुदुर्ग- विवेक परब।

शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गसृष्टीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यास ते निसर्गाशी अधिक सक्षमपणे जोडले जातील. माणूस-निसर्ग सहसबंध समजावे या उद्देशाने जि. प. शाळा चिंदर कुंभारवाडीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत आज आचरा येथील (मेनग्रोव) कांदळवन सफरीचे आयोजन केले होते.

आचरा बाग-जामडुल येथील ओमप्रकाश आचरेकर यांच्या सहाय्याने त्यांच्या बोटीमधून आचरा खाडीमध्ये सुमारे पाचशे एकर परिसरात पसरलेल्या मेनग्रोव फॉरेस्टचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. या सफरीमध्ये “मेनग्रोव” विषयी संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ओम आचरेकर यांनी करून दिली. मेनग्रोवचे महत्व, त्यांची उत्पत्ती, वाढ याची संपूर्ण सविस्तर माहिती ऐकताना विद्यार्थी अचंबित झाले. या क्षेत्र भेटी दरम्यान मेनग्रोव सोबतच विविध समुद्री वनस्पती, खेकडा शेती, नानाविध प्रकारचे पक्षी, लाखोंच्या संख्येने वटवाघळे या सर्व निसर्गाच्या किमया विद्यार्थ्याना जवळून बघता आले. औषधी वनस्पतींची माहिती देखील मिळाली. शिवाय आचरा नदी व अरबी समुद्र यांचा संगम बघता आला. खाडीमध्ये फिरून ‘खाडी’ची संकल्पना सहज स्पष्ट झाली. एकंदरीत विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीत निसर्गातील चमत्कार बघून कित्येक वेळा ; वा !फारच सुंदर ! असे उद्गार काढले. शिक्षक राजेंद्र चौधरी व भीमाशंकर शेतसंदी यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण असे ज्ञान दिल्याचे सांगत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण चिंदरकर, शा. व्य. समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले.

Leave a Comment

और पढ़ें